song lyrics / उतारा केळकर / Saang Sawlya Door lyrics  | FRen Français

Saang Sawlya Door lyrics

Performers उत्तरा केळकरउतारा केळकर

Saang Sawlya Door song lyrics by उतारा केळकर official

Saang Sawlya Door is a song in Marathi

सांज सावल्या सांज सावल्या
दूर पसरल्या थबकून पानोपानी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
सांज सावल्या
सांज सावल्या दूर पसरल्या थबकून पानोपानी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
सांज सावल्या

ओढ अनोखी सूर आळवी शब्द गुंफुनी ओठी
ओढ अनोखी
ओढ अनोखी सूर आळवी शब्द गुंफुनी ओठी
दिन ना कळला कधी हरवला स्मरता स्मरता गाठी
स्मरता स्मरता गाठी
बघता बघता हळूच लपली
बघता बघता हळूच लपली वसुंधरेची लेणी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
सांज सावल्या

क्षितीजावरती भिरभिर फिरती स्मृतीगंधांचे पक्षी
क्षितीजावरती
क्षितीजावरती भिरभिर फिरती स्मृतीगंधांचे पक्षी
लुकलुकत्या तेजात तळपते नभांगणाची नक्षी
नभांगणाची नक्षी
शांत शांत जळ तरंग बनुनी
शांत शांत जळ तरंग बनुनी गाती सुस्वर गाणी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
सांज सावल्या

कातरवेळी गूढ पसरली किमया मंतरलेली
किमया मंतरलेली
धूसर केली सगळी नाती अवनीवर जडलेली
अवनीवर जडलेली
अवखळ वारा मंद वाहुनी भिजवी संध्यारजनी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
सांज सावल्या
सांज सावल्या सांज सावल्या
दूर पसरल्या थबकून पानोपानी
आठविता क्षण सुखद स्मृतींचे
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
नयनी येई पाणी नयनी येई पाणी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Saang Sawlya Door lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the star
2| symbol at the top of the helmet
3| symbol to the left of the bulb
grid grid grid
grid grid grid
grid grid grid