song lyrics / अरुण / या जन्मावर या जगण्यावर lyrics  | FRen Français

या जन्मावर या जगण्यावर lyrics

Performers अरुणअरुण दाते

या जन्मावर या जगण्यावर song lyrics by अरुण official

या जन्मावर या जगण्यावर is a song in Marathi

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर

चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे
सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर

बाळाच्या चिमण्या ओठांतुन
बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदीच्या काठी सजणासाठी
नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
या जन्मावर

या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती
या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for या जन्मावर या जगण्यावर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the thumbs up
2| symbol to the right of the heart
3| symbol at the bottom of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid