song lyrics / अरुण / Dilya Ghetalya Vachnanchi lyrics  | FRen Français

Dilya Ghetalya Vachnanchi lyrics

Performer अरुण

Dilya Ghetalya Vachnanchi song lyrics by अरुण official

Dilya Ghetalya Vachnanchi is a song in Marathi

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
बकुळीच्या झाडाखाली निळ्या चांदण्यात
हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणांत
त्या सगळया बकुळ फुलांची
त्या सगळया बकुळ फुलांची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

शुभ्रफुले वेचित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
शुभ्रफुले वेचित रचिला चांद तू जुईचा
म्हणालीस चंद्रोत्सव हा सावळया भुईचा
फुलातल्या त्या चंद्राची
फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो मोहूनी मनात
भुरभुरता पाऊस होता सोनिया उन्हात
गवतातून चालत होतो मोहूनी मनात
चुकलेल्या त्या वाटेची
चुकलेल्या त्या वाटेची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे

हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी
हळूहळू काजळताना सांज ही सुरंगी
तुझे भास दाटूनी येती असे अंतरंगी
या उदास आभाळाची
या उदास आभाळाची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
मनांतल्या मोरपिसाची शपथ तुला आहे
शपथ तुला आहे
शपथ तुला आहे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Dilya Ghetalya Vachnanchi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol at the top of the television
3| symbol to the right of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid