song lyrics / अरुण / Akherche Yeteel Maaiya Hech Shabd Othi lyrics  | FRen Français

Akherche Yeteel Maaiya Hech Shabd Othi lyrics

Performer अरुण

Akherche Yeteel Maaiya Hech Shabd Othi song lyrics by अरुण official

Akherche Yeteel Maaiya Hech Shabd Othi is a song in Marathi

अखेरचे येतिल माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या
केली पण प्रीती
अखेरचे येतिल माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या,
केली पण प्रीती
अखेरचे

इथे सुरू होण्याआधी
संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते
डोळ्यातिल पाणी
डोळ्यातिल पाणी
इथे सुरू होण्याआधी
संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते
डोळ्यातिल पाणी
डोळ्यातिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या
तेच गीत गाती
लाख चुका असतिल केल्या
केली पण प्रीती
अखेरचे

सर्व बंध तोडुनी जेव्हा
नदी धुंद धावे
सर्व बंध तोडुनी जेव्हा
नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे
तिला नसे ठावे
तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे
माती
लाख चुका असतिल केल्या
केली पण प्रीती
अखेरचे

गंध दूर ज्याचा आणिक
जवळ मात्र काटे
गंध दूर ज्याचा आणिक
जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे
कधी हाय वाटे
कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे
जीव तुझ्यासाठी
लाख चुका असतिल केल्या
केली पण प्रीती
अखेरचे

आर्त गीत आले जर हे कधी
तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला
या स्वरांनी
आर्त गीत आले जर हे कधी
तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला
या स्वरांनी
डोळ्यातुन माझ्यासाठी
लाव दोन ज्योती
लाख चुका असतिल केल्या,
केली पण प्रीती
अखेरचे येतिल माझ्या
हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या
केली पण प्रीती
अखेरचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Akherche Yeteel Maaiya Hech Shabd Othi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the eye
2| symbol to the left of the envelope
3| symbol to the left of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid