song lyrics / उषा मंगेशकर / ससा तो ससा की कापूस जसा lyrics  | FRen Français

ससा तो ससा की कापूस जसा lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

ससा तो ससा की कापूस जसा song lyrics by उषा मंगेशकर official

ससा तो ससा की कापूस जसा is a song in Marathi

ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
निजला तो संपला सांगे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANIL ARUN, SHANTARAM NANDGAONKAR
Copyright: Royalty Network

Comments for ससा तो ससा की कापूस जसा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol at the bottom of the target
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid