paroles de chanson / उषा मंगेशकर parole / ससा तो ससा की कापूस जसा lyrics  | ENin English

Paroles de ससा तो ससा की कापूस जसा

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson ससा तो ससा की कापूस जसा par उषा मंगेशकर lyrics officiel

ससा तो ससा की कापूस जसा est une chanson en Marathi

ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहिले
वाटेत थांबले ना कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळा मनी होई
निजला तो संपला सांगे
ससा
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: ANIL ARUN, SHANTARAM NANDGAONKAR
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de ससा तो ससा की कापूस जसा

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la loupe
2| symbole à gauche du cadenas
3| symbole à gauche du téléviseur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid