song lyrics / सुधीर फडके / तुझे गीत गाण्यासाठी lyrics  | FRen Français

तुझे गीत गाण्यासाठी lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

तुझे गीत गाण्यासाठी song lyrics by सुधीर फडके official

तुझे गीत गाण्यासाठी is a song in Marathi

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउं दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवुन सजल्या या हिरव्या वाटा
या सुंदर यात्रेसाठी
या सुंदर यात्रेसाठी मला जाउं दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
मोर केशराचे झुलती पहाटेस दारी
झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी
वाजती सतारी
सोहळयात सौंदर्याच्या
सोहळयात सौंदर्याच्या तुला पाहु दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे
तुझे प्रेम घेउन येती गंध धुंद वारे
गंध धुंद वारे
चांदण्यात आनंदाच्या
चांदण्यात आनंदाच्या मला न्हाउ दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी

एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना
पौर्णिमा स्वरांची माझ्या
पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे
तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुंदे रे
तुझे गीत गाण्यासाठी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Mangesh Padgaonkar, Yeshwant Deo
Copyright: Royalty Network

Comments for तुझे गीत गाण्यासाठी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the envelope
2| symbol to the right of the helmet
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid