song lyrics / आनंद शिंदे / माझी मैना गावावर राहिली lyrics  | FRen Français

माझी मैना गावावर राहिली lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

माझी मैना गावावर राहिली song lyrics by आनंद शिंदे official

माझी मैना गावावर राहिली is a song in Marathi

माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
ओतीव बांधा रंग गव्हाला
कोर चंद्राची उदात्त गुणांची
मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची
हसून बोलायची मंद चालायची
सुगंध केतकी सतेज कांती
घडीव पुतली सोन्याची नव्या नवतीची
काडी दवन्याची रेखीव भुवया
कमान जणू इन्द्रधनुची
हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची
तशी ती माझी गरीबाची
मैना रत्नाची खाण हा हे
मैना रत्नाची खाण माझा जिव की प्राण
नसे सुखाला वाण
तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
अहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची
अहो या गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची
झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची
वेळ होती ती भल्या पहाटेची
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची
घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची
गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची
शिकस्त केलि मी तिला हसवण्याची
खैरात केली पत्रांची वचनांची
दागिन्यांन मडवुन काडयाची
बोली केली शिंदेशाही तोड्याची
साज कोल्हापुरी वज्रटिक
गल्यात माळ पुतल्याची
कानात गोखरे पायात मासोल्या
कानात गोखरे पायात मासोल्या
दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची
परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची
आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची
मैना खचली मनात हा हे
मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात
नाही हसली गालात हात उन्चावुनी उभी राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली

अहो या मुम्बई गर्दी बेकरांची
अन त्यात भर झाली माझी एकाची
मढ़ेवर पडावी मुठभर माती
तशी गत झाली आमची
ही मुम्बई यंत्राची तंत्राची जागनाराची मरनारांची शेंदिची दाढ़ीची
हडसनच्या गाडीची नायलोनच्या आणि जोर्जेटच्यातलम साडीची
बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची
माडीवर माडी हिरव्या माडीची
पैदास इथे भलतीच चोरांची
एतखाऊची शिर्जोरांची
हरामखोरांची भांडवलदाराची
अन पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची
पर्वा केलि नाही उन्हाची थंडीची पावसाची
पाण्यान भरल खीस माझ वान माला एका छात्रिची
अन त्याच दरम्यान चलवल उठली संयुक्त महाराष्ट्राची
बेलगांव कारवार निपानी गोव्यासह एकभाषिक राज्याची
चकाकली संगीन अन्यायाची फ़ौज उठली बिनिवारची
कामगारांची शेतकरीयांची मध्यमवर्गियांची
उठला मराठी देश हा हे
उठला मराठी देश आला मैदानी त्वेष
वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर सहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
म्हणे अन्नाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची
मी-तू पणाची जुल्माची जबरिची तस्कराची
निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे लंका जलाली त्याची
तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची
अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची
परलच्या प्रल्याची लालबागच्या लढायची फौंटनच्या चढ़ाइची
झाल फौंटनला जंग हा हे
झाल फौंटनला जंग तिथे बांधुनी चंग
आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची
अन दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची
पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची
गावाकडे मैना माझी भेट नाही तिची
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेलगांव कारवार डांग उम्बरगावावर मालकी दुजांची
धोंड खंडनीची कमाल दंडलीची चिड बेकिची गरज एकीची
म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची
आता वलु नका हा हे
आता वलु नका रणी पलु नका कुणी चलू नका
बिनी मारायची अजुन राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
माझी मैना गावाकडं राहिली
माझ्या जिवाची होतिया काहिली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for माझी मैना गावावर राहिली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the camera
2| symbol to the right of the trash
3| symbol at the bottom of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid