song lyrics / सुधीर फडके / Lakadachya Vakharit lyrics  | FRen Français

Lakadachya Vakharit lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

Lakadachya Vakharit song lyrics by सुधीर फडके official

Lakadachya Vakharit is a song in Marathi

लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
माकडाचा दवाखाना हो माकडाचा दवाखाना
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा खोटं म्हणा तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट डोक्यावर हॅट
पायात विजार तोंडात सिगार

एक आली काळी बाई
एक आली काळी बाई तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं धीर धरा
माकड म्हणालं धीर धरा जरा थोडा आ करा
कोकिळेनं केलं आ माकड म्हणालं वा
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
काय म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं गंडमाळा
टॉनसिल्स बाई टॉनसिल्स
चार महिने गाऊ नका
चार महिने गाऊ नका
उन्हातान्हात जाऊ नका
अंब्याचा मोहोर खाऊ नका
थोडा तरी विसावा घ्या आणि बारा कैर्‍या आणून द्या
भंभेरी भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌

बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या दवाखान्यात आल्या
माकड म्हणालं या ताई बसा अशा शेजारी
बोकोबा की पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी
मनू म्हणाली वैद्यबुवा यांच्यासाठी दवा हवा
काय झालं बोकोबाला मनु म्हणाली खोकला
माकड म्हणालं ताईंना
सांगा तुमच्या यजमानांना दूध दही पिऊ नका
उंदीरबिंदीर खाऊ नका अडगळीत जाऊ नका
गोळ्या देतो बडगा छाप
तासातासांनी दोन घ्या
भंभेरी भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌
मग आला वखारवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला
रोग्याने घेतली काठी हाणली त्याच्या पाठी
रोगी मारता राहीना माकडाला उठता येईना
भंभेरी भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌
भंभेरी भम्‌ भम्‌ भंभेरी भम्‌
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for Lakadachya Vakharit lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the thumbs up
2| symbol to the left of the star
3| symbol at the bottom of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid