song lyrics / उषा मंगेशकर / Kon Hotis Too Kaay Jhalis Too lyrics  | FRen Français

Kon Hotis Too Kaay Jhalis Too lyrics

Performers उषा मंगेशकरचंद्रशेखर गाडगीळ

Kon Hotis Too Kaay Jhalis Too song lyrics by उषा मंगेशकर official

Kon Hotis Too Kaay Jhalis Too is a song in Marathi

नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू

सुंदर रूप तुझे निर्मळ भारी
होतीस अशी तू पवित्र नारी
डोईवर पदर पदरात चेहरा
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा
होती यशोदा तू होतीस तारा तू
होतीस राधा तू होतीस मीरा तू
पार्वती ती महान झाली
राज्य वैभव टाकून आली

काळ बदलला तूही बदलली
सार्यांना भुलवीत रसत्याने चालली
पदराचं भान नाही अब्रूची जाण नाही
सडक लैला अशी बदनाम झालीस तू

तू अशी नारी होत लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली
कोण होतास तू काय झालास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कोण होतास तू काय झालास तू
कोण होतास तू काय झालास तू

तेजस्वी रूप तुझे करारी बाणा
होतास असा तू मर्दाचा राणा
सिंहाची छाती होती उरात आग होती
वाघाची झेप होती डोळ्यांत जाग होती
होतास राम तू होतास बुद्ध तू
होतास कृष्ण तू विवेकानंद तू
भगतसिंग तो महान झाला
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला
काळ बदलला तूही बदलला
करीत इशारे तू रस्त्याने चालला
पोरींची छेडाछेडी लोचट लाडीगोडी
सडक मजनू असा बदनाम झालास तू

तू असा शूर होता लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कोण होतास तू काय झालास तू हे

ओ लाजवंती कालची तू चंचल छछोर होई
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू
अग वेडे कशी वाया गेलीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू

आखुड केस हे आखुड कपडे
पाठ ही उघडी पोट हे उघडे
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली
साडी बिचारी खाली घसरली
नवा तुझा ढंग हा बघण्याजोगा
पुढून मुलगी मागून मुलगा
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू

तू अशी नारी होती लाखात भारी होती
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू
कोण होतीस तू काय झालीस तू हे

आ काल तुझ्या हाती तलवार होती
लढवय्याचा तू वारसा
आज तुझ्या हाती कंगवा
घडीघडी बघसी तू आरसा
कोण होतास तू काय झालास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कोण होतास तू काय झालास तू
कोण होतास तू काय झालास तू

काय तुझी वेषभुषा आता कहर झाला
कालचा हिरो हा आज झिरो झाला
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका
लांबलांब केस हे मिशिला चटका
तर्हा तुझी बायकी बघण्याजोगी
पुढून मुलगा हा मागून मुलगी
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू

तू असा शूर होता लाखात वीर होता
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू
कोण होतास तू काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू
कोण होतास तू काय झालास तू हे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Kadam Ram

Comments for Kon Hotis Too Kaay Jhalis Too lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the bulb
2| symbol at the bottom of the smiley
3| symbol to the left of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid