Dam Kari Kam is a song in Marathi
पारा डोळ्यान पाप सारी नारायण बघतो
पैशापाई माणूस मरतो पैशावर जगतो
पैशावर जगतो
वासुदेवाची ऐका वानी हा हा
वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागुनी धाव
पैशाची जादू लई न्यारी तान्या पोराला त्याची हाव
आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागुनी धाव
जल्मापासनं सारी मानसं
हे जल्मापासनं सारी मानसं ह्या पैशाची गुलाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
कुणी जुगार सट्टेबाज कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुणी घेतो एकच घुटका
कुणी जुगार सट्टेबाज कुणी खेळं मुंबई मटका
चांडाळ चौकडी जमता कुणी घेतो एकच घुटका
शर्यत घोडा चौखुर सुटला
हे शर्यत घोडा चौखुर सुटला फेकला त्यानं लगाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
ह्या कवडी दमडीपाई कुणी राकुस घेई जीव
कुणी डाका दरोडा घाली कुणी जाळून टाकी गाव
ह्या कवडी दमडीपाई कुणी राकुस घेई जीव
कुणी डाका दरोडा घाली कुणी जाळून टाकी गाव
बगलंमंदी सुरी दुधारी
बगलंमंदी सुरी दुधारी मुखि देवाचं नाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
नक्षत्रावानी पोरगी बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नसं
नक्षत्रावानी पोरगी बापाच्या गळ्याला फास
ठरल्यालं लगीन मोडतं हुंड्याला पैसा नसं
काळीज भरलं शिरिमंतीनं
अहो काळीज भरलं शिरिमंतीनं हातात नाही छदाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
वाड्यात पंगती बसल्या लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आग
वाड्यात पंगती बसल्या लई आग्रेव जागोजाग
दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आग
संसाराचं ओझं घेऊन
अहो संसाराचं ओझं घेऊन कुणी टिपावा घाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पिरती
नाचते नारीची अब्रू छनछुन्नक तालावरती
पैशानं बायको खूस पैशानं बोलते पिरती
ह्या पैशाच्या बादशहाला
ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
वासुदेवाची ऐका वानी हा हा
वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी काम
दाम करी काम येड्या दाम करी