song lyrics / शुभांगी जोशी / पंढरीनाथ झडकरी आता lyrics  | FRen Français

पंढरीनाथ झडकरी आता lyrics

Performers शुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

पंढरीनाथ झडकरी आता song lyrics by शुभांगी जोशी official

पंढरीनाथ झडकरी आता is a song in Marathi

पंढरीनाथा झडकरी आता
पंढरीनाथा झडकरी आता
पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला
विनविते रखुमाई विठ्ठला
पंढरीनाथा झडकरी आता

ज्ञानदेवे रचिला पाया
कळस झळके वरि तुकयाचा
ज्ञानदेवे रचिला पाया
कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण
याच मंदिरी आलो आपण
प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी
गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा
रहायचे मग इथे कशाला
पंढरीनाथा झडकरी आता

धरणे धरुनी भेटीसाठी
पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती
भाविक भोंदू पूजक म्हणती
केवळ अमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला
बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला
ना तर द्या हो निरोप मजला
पंढरीनाथा झडकरी आता
पंढरीनाथा झडकरी आता
पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला
विनविते रखुमाई विठ्ठला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for पंढरीनाथ झडकरी आता lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the helmet
2| symbol at the top of the smiley
3| symbol to the right of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid