song lyrics / अशा भोसले / शारद सुंदर चंदेरी राती lyrics  | FRen Français

शारद सुंदर चंदेरी राती lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

शारद सुंदर चंदेरी राती song lyrics by अशा भोसले official

शारद सुंदर चंदेरी राती is a song in Marathi

शारद सुंदर चंदेरी राती
ला ला ला ला ला ला ला ला

शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

मोहन मधुर राती
भराला येऊ दे प्रीती
प्रीतिची हीच न रीती
कशाला कुणाची भीती
झाडामागे चांद हा वरती आला
ये ना ये ना
आतुर जीव हा झाला
मी भूलावे स्वैर व्हावे गीत गावे
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला

वाऱ्यात लहर मंद
फुलांचा मादक गंध
मोगरा चमेली कुंद
जिवाला करिती धुंद
माझ्या देही पुनवचांदणे साजे
प्राणांमध्ये प्रीतिची पावरी वाजे
आज राया धुंद काया मोहवाया
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
साजणा रे मोहना रे ऐक ना रे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी
सगेसोयरे मी सांडिले पाठी
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत घेऊन कवेत साजणा झुलव मला
ला ला ला ला ला हा ला ला
ला ला ला ला ला हा ला ला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Hemant Bhosle, Shanta Shelke

Comments for शारद सुंदर चंदेरी राती lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the camera
2| symbol to the left of the television
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid