song lyrics / राणी वर्मा / Shala Chandoba Gurujinchi lyrics  | FRen Français

Shala Chandoba Gurujinchi lyrics

Performer राणी वर्मा

Shala Chandoba Gurujinchi song lyrics by राणी वर्मा official

Shala Chandoba Gurujinchi is a song in Marathi

चला चला पावसाची पिरपिर आणि पिरपिरणारी शाळा
सुरु व्हायच्या आधी आपण पटकन
एका वेगळ्याच शाळेत जाऊन येऊया
अहो नंतर कदाचित वेळ नाही मिळणार
अभ्यासात चला चला ते यान पकडायला हवंना
हो अहो यानातच बसून तिकडे जावं लागत स्पेश्शट्टल
यू नो कारण हि शाळा कुठे आहे माहितेय का
निळ्या निळ्या मैदानात आणि शाळेतले क्लास टीचर
कोण आहेत माहितेय आपल्या ओळखीचेच आहेत ते चांदोबा गुरुजी

या वार्‍याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची

आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबील अपुल्या इवल्या डोळ्यांची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची

द्वितीयेपासून रोजच येती गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची

कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्‍यांची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची

कधी वेळेवर केव्हा उशीरा अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना कधी कुणा करीती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
या वार्‍याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Shala Chandoba Gurujinchi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the right of the target
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid