paroles de chanson / उषा मंगेशकर parole / इष्काचि इंगळी lyrics  | ENin English

Paroles de इष्काचि इंगळी

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson इष्काचि इंगळी par उषा मंगेशकर lyrics officiel

इष्काचि इंगळी est une chanson en Marathi

आ आ आ आ
मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात
नको तिथंच पडला अवचित माझा हात
हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली
ग बाई मला इष्काचि इंगळी डसली
ग बाई मला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग
ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली
खरंच हिला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग

मारलि किंकाळी कळ लइ आली
मारलि किंकाळी कळ लइ आली
उरिं घामानं भिजली चोळी
अंगाअंगाची काहिली झाली
अंगाअंगाची काहिली झाली
सांगा ही कळ कसली
बाई मला इष्काचि इंगळी डसली
ग बाई मला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग
ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली
आहो दाजी हिला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग

सार्या घरात फिरले बाई ग
सार्या घरात फिरले बाई ग
मला औशिद गावलं न्हाई ग
तंवर कुणाची चाहूल आली
तंवर कुणाची चाहूल आली
खूण खुणेला पटली
बाई मला इष्काचि इंगळी डसली
ग बाई मला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग
ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली
आहो दाजी हिला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग

ह्या इंगळीचा कळला इंगा
ह्या इंगळीचा कळला इंगा
खुळ्यावानि मी घातला पिंगा
मंतर घाला हलकाहलका
मंतर घाला हलकाहलका
नार चुकुन फसली
बाई मला इष्काचि इंगळी डसली
ग बाई मला इष्काचि इंगळी डसली
बाई ग बाई ग
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de इष्काचि इंगळी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la loupe
2| symbole à gauche de la cible
3| symbole à droite du cadenas
grid grid grid
grid grid grid
grid grid grid