song lyrics / प्रभंजन मराठे / बेडकीच्या पिल्लानं lyrics  | FRen Français

बेडकीच्या पिल्लानं lyrics

Performers प्रभंजन मराठेप्रभानजन मराठेप्रभंजन मराठे

बेडकीच्या पिल्लानं song lyrics by प्रभंजन मराठे official

बेडकीच्या पिल्लानं is a song in Marathi

आता बेडकीच्या लहानश्या पिल्लाची गोष्ट
तुम्ही कदाचित या आधी ऐकली असेल
पुस्तकात वाचली पण असेल
पण आता हि लहानशी गोष्ट गाण्यातून ऐकताना कशी वाटते पहा बरं

बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
हम्मा हम्मा आवाज ऐकून पळे दूर
एवढा मोठ्ठा देह पाहुनी बेडुक घाबरला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
धावत धावत तळ्यात आले सगळे बेडुक सावध झाले
पाहून बेडकी बाईला पिल्लू बिलगे आईला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बेडकी म्हणते डराँव डराँव का थरथरता बेडुकराव
दोन बाजूला हात पसरले
पिल्लू सारे सांगू लागले
एवढा मोठ्ठा प्राणी आता
तळ्याच्या काठी चरत होता
लठ्ठ चांगला असा भला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बेडकी म्हणाली डराँव डराँव केवढा मोठ्ठा सांगा नाव
जगात सार्‍या माझ्यापेक्षा मोठा नाही कुणीच राव
पुढे येउनी अंग फुगवुनी पिल्लाला पाही विचारुनी
एवढा मोठ्ठा
नाही आई याहुनी मोठ्ठा
पुन्हा तियेने अंग फुगविले एवढा मोठ्ठा
नाही नाही याहुनी मोट्ठा
बेडकी राही फुगवित पोटा पिल्लू म्हणे तर याहून मोठ्ठा
बघताबघता फट्ट जाहले बेडकीचे मग पोटची फुटले
अंगी नसता खरी योग्यता उगाच करता बरोबरी
जिवास मुकली खुळी बेडकी तिची मोडली खोड पुरी
म्हणून बढाई नको मुलांनो खरं सांगतो तुम्हाला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला
बैल पाहिला बैल पाहिला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for बेडकीच्या पिल्लानं lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the house
2| symbol to the right of the star
3| symbol at the bottom of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid