song lyrics / अशा भोसले / मी तुला न पाहिले lyrics  | FRen Français

मी तुला न पाहिले lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेAsha Bhosle

मी तुला न पाहिले song lyrics by अशा भोसले official

मी तुला न पाहिले is a song in Marathi

मी तुला न पाहिले तू मला न पाहिले
का कसे कधी कुठे कुणी कुणास जिंकिले
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले

शब्दही न बोलता साद घातली कुणी
शब्दही न बोलता साद घातली कुणी
आज अंतरातली तार छेडिली कुणी
आज अंतरातली तार छेडिली कुणी
सात रंग सात सूर एकसाथ रंगले
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले

फूल फूल उमलले गंध दाटला मनी
फूल फूल उमलले गंध दाटला मनी
हृदयी गूज बोलते तेच आज लोचनी
हृदयी गूज बोलते तेच आज लोचनी
स्वप्न मीलनातल्या कल्पनेत लाजले
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले

नंदनातली फुले वर्षतात का शिरी
नंदनातली फुले वर्षतात का शिरी
व्यापुनी मला उरे ही अबोल माधुरी
व्यापुनी मला उरे ही अबोल माधुरी
आज जीवनातली रम्यता का मला कळे
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले
का कसे कधी कुठे कुणी कुणास जिंकिले
मी तुला न पाहिले तू मला न पाहिले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Madhusudan Kalelkar, Kadam Ram

Comments for मी तुला न पाहिले lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the trash
2| symbol to the right of the thumbs up
3| symbol to the left of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid