song lyrics / शंकर महादेवन / गर्जा जयजयकार lyrics  | FRen Français

गर्जा जयजयकार lyrics

Performers शंकर महादेवनShankar Mahadevan

गर्जा जयजयकार song lyrics by शंकर महादेवन official

गर्जा जयजयकार is a song in Marathi

गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती अन्‌ वज्रांचे छातीवरती
घ्या झेलून प्रहार घ्या झेलून प्रहार
क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार

क्रुद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करु द्या रक्ताचे पान
संहारक काली तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही मृत्युंजय आम्ही
आम्हाला कसले कारागार
अहो हे कसले कारागार आ आ आ
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार

कशास आई भिजविसि डोळे
कशास आई भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळाखळा तुटणार
आई खळाखळा तुटणार आ आ आ
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार

श्वासांनो जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयांतिल खंत
सांगा "वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती अन्‌ वज्रांचे छातीवरती
घ्या झेलून प्रहार घ्या झेलून प्रहार
क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for गर्जा जयजयकार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the heart
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol to the left of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid