song lyrics / अशा भोसले / आज दिसे का चंद्र गुलाबी lyrics  | FRen Français

आज दिसे का चंद्र गुलाबी lyrics

Performers अशा भोसलेवसंतराव देशपांडेवसंतराव देशपांडेआशा भोसलेआशा भोसले

आज दिसे का चंद्र गुलाबी song lyrics by अशा भोसले official

आज दिसे का चंद्र गुलाबी is a song in Marathi

आज दिसे का चंद्र गुलाबी
हवेस येतो गंध शराबी
अष्टमिच्या या अर्ध्या राती
तुझी नि माझी फुलली प्रीती
तुझी नि माझी फुलली प्रीती

अर्धे मिटले अर्धे उघडे
या नयनांतुन स्वप्न उलगडे
तळहातावर भाग्य उतरले
हात तुझा रे माझ्या हाती
तुझी नि माझी फुलली प्रीती

स्वप्नि तुझ्या मी येता राणी
दुनिया झाली स्वप्नदेखणी
बघ दोघांचे घरकुल अपुले
निशिगंधाची बाग सभोंती
तुझी नि माझी फुलली प्रीती

अर्धी मिटली अर्धी उघडी
खिडकी मजसी दिसे तेवढी
अनुरागाच्या मंजुळ ताना आ आ आ
अनुरागाच्या मंजुळ ताना
कर्णफुलासम कानी येती
तुझी नि माझी फुलली प्रीती

या स्वप्नातच जीव भरावा
कैफ असा हा नित्य उरावा
अशीच व्हावी संगमरवरी
अर्धोन्मीलित अपुली नाती
तुझी नि माझी फुलली प्रीती
तुझी नि माझी फुलली प्रीती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, VASANT PAWAR
Copyright: Royalty Network

Comments for आज दिसे का चंद्र गुलाबी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of magnifying glass
2| symbol at the bottom of the calculator
3| symbol to the left of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid