song lyrics / Sadhana Sargam / राम जन्मला गं सखी lyrics  | FRen Français

राम जन्मला गं सखी lyrics

Performers Sadhana Sargamसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसाधना सारेगमसुधीर फडके साधना सरगमसाधना सरगमसाधना सरगमसाधना सरगम

राम जन्मला गं सखी song lyrics by Sadhana Sargam official

राम जन्मला गं सखी is a song in Marathi

त्या पवित्र पायास सेवनानंतर कल्पतरूला फुलांचा बहर
यावा तास दशरथाच्या प्रासादात घडलं
अयोध्येत हि वार्ता चंदन सुंगंधाप्रमाणे दर्वळली
दशरथाच्या तिन्ही महारांना आई होणार
अयोध्येला आणि दशरथाला वारस लाभणार
आणि तो क्षण आला चैत्रमासातील क्षुब्द नवमीला
हि वार्ता प्रकटली आणि सारे नगरी वृक्ष लता
आकाश धरणी पशुपक्षी अवघा कां अन
कां मनाचा निरंजन घेऊन गाऊ लागला

चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणी सौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
काय काय करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला
उच्‍चरवें वायू त्यांस हसून बोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला
युवतींचा संघ एक गात चालला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

वीणारव नूपुरांत पार लोपले पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनी नृत्यगायनी
सूर रंग ताल यात मग्‍न मेदिनी मग्‍न मेदिनी
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for राम जन्मला गं सखी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the camera
2| symbol to the left of the heart
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid