song lyrics / Manna Dey / धुंद आज डोळे lyrics  | FRen Français

धुंद आज डोळे lyrics

Performers Manna Deyमन्ना डेमानना देमन्ना देमान्ना डे

धुंद आज डोळे song lyrics by Manna Dey official

धुंद आज डोळे is a song in Marathi

धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली
धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली
धुंद आज डोळे

जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली चल
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली
धुंद आज डोळे

नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी
नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी
तुझी पापणी का झुके आज खाली (हाय)
तुझी पापणी का झुके आज खाली
घडी मीलनाची तुषारात न्हाली
धुंद आज डोळे

तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा
फुटावा कळीला दंवाचा शहारा
फुटावा कळीला दंवाचा शहारा
हवे ते मिळाले अश्या रम्य काली (चावट)
हवे ते मिळाले अश्या रम्य काली
नवी रुपराणी नवा साज ल्याली
धुंद आज डोळे हवा धुंद झाली (हो हो)
गाली तुझ्या ग कशी लाज आली
गाली तुझ्या ग कशी लाज आली
कशी लाज आली कशी लाज आली (ल ला ला ल ला ला)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Jog Prabhakar
Copyright: Royalty Network

Comments for धुंद आज डोळे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol to the right of the padlock
3| symbol to the right of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid