song lyrics / Asha Bhosale / Sheptiwalya Pranyanchi lyrics  | FRen Français

Sheptiwalya Pranyanchi lyrics

Performer Asha Bhosale

Sheptiwalya Pranyanchi song lyrics by Asha Bhosale official

Sheptiwalya Pranyanchi is a song in Marathi

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला पोपट म्हणाला
मित्रांनो देवाघरची लूट देवाघरची लूट
तुम्हां आम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय
या शेपटाचे कराल काय
गाय म्हणाली
गाय म्हणाली अश्शा अश्शा शेपटीने मी वारीन माश्या
गाय म्हणाली अश्शा अश्शा
शेपटीने मी वारीन माश्या
घोडा म्हणाला
घोडा म्हणाला ध्यानात धरीन ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने असेच करीन असेच करीन
कुत्रा म्हणाला
कुत्रा म्हणाला खुषीत येईन तेव्हा
शेपूट हलवीत राहीन
खुषीत येईन तेव्हा
शेपूट हलवीत राहीन
मांजरी म्हणाली
मांजरी म्हणाली नाही ग बाई
कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही
खूप खूप रागवीन
तेंव्हा शेपूट फुगवीन शेपूट फुगवीन
माकड म्हणाले
कधी वर कधी बुडी कधी वर कधी बुडी
शेपटीवर मी मारीन उडी शेपटीवर मी मारीन उडी
मासा म्हणाला
मासा म्हणाला शेपूट म्हणजे दोन हात दोन हात
पोहत राहीन प्रवाहात पोहत राहीन प्रवाहात
कांगारू म्हणाले
कांगारू म्हणाले माझे काय
तुझे काय हा हा हा
शेपूट म्हणजे पाचवा पाय
शेपूट म्हणजे पाचवा पाय
आ आ आ मोर म्हणाला
मोर म्हणाला पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन
पीस पीस फुलवुन धरीन मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन नाच मी करीन
पोपट म्हणाला छान छान छान छान
देवाच्या देणगीचा ठेवा मान
आपुल्या शेपटाचा उपयोग करा
नाही तर काय होईल
दोन पायाच्या माणसागत
आपुले शेपूट झडून जाईल
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Davjekar Datta, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for Sheptiwalya Pranyanchi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the bulb
2| symbol at the top of the calculator
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid