song lyrics / संगीता कुलकर्णी / Reshmachya Reghani lyrics  | FRen Français

Reshmachya Reghani lyrics

Performers संगीता कुलकर्णीशुभांगी जोशी

Reshmachya Reghani song lyrics by संगीता कुलकर्णी official

Reshmachya Reghani is a song in Marathi

रेशमाच्या रेघांनी लालकाळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला
रेशमाच्या रेघांनी लालकाळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला

नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची
नवी कोरी साडी लाखमोलाची
भरली मी नक्षी फूलयेलाची येलाची
बाई येलाची
गुंफियलं राघू मोर
राघू मोर जोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

जात हुते वाटेनं मी तोर्यात मी तोर्यात
जात हुते वाटेनं मी तोर्यात मी तोर्यात
अवचित आला माझ्या होर्यात जी होर्यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला

भीड काही ठेवा आल्या गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळयाची
भीड काही ठेवा आल्या गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळयाची डोळयाची
बाई डोळयाची
काय म्हनू बाईबाई
तुमच्या या खोडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
हात नगा लावू माझ्या साडीला
रेशमाच्या रेघांनी लालकाळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Anandghan, Shanta Shelke
Copyright: Royalty Network

Comments for Reshmachya Reghani lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the heart
2| symbol to the left of the padlock
3| symbol at the bottom of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid