song lyrics / अपर्ण मयेकर / Bugadi Majhi Sandli Ga lyrics  | FRen Français

Bugadi Majhi Sandli Ga lyrics

Performers अपर्ण मयेकरप्रिया मयेकरचंद्रकला दसरी

Bugadi Majhi Sandli Ga song lyrics by अपर्ण मयेकर official

Bugadi Majhi Sandli Ga is a song in Marathi

हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
ग जाता साताऱ्याला
चुगली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला
ग माझ्या म्हाताऱ्याला
चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला
ग हिच्या म्हाताऱ्याला

माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
जवळ बाहतो जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई
त्याच्या इशार्याला त्याच्या इशार्याला
चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला
ग हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
ग जाता साताऱ्याला

आज अचानक घरी तो आला
हो आज अचानक घरी तो आला
पैरण फेटा नि पाठीस शेमला
फार गोड तो मजसी गमला
मजसी गमला मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई त्याला शेजाऱ्याला
माझ्या शेजाऱ्याला
चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला
ग हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
ग जाता साताऱ्याला

घरात नव्हते तेव्हां बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा
तोबा तोबा तोबा तोबा
वितळू लागे ग लोणी बाई बघता निखाऱ्याला
बघता निखाऱ्याला
चुगली नगा सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला
ग हिच्या म्हाताऱ्याला
हाय बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला
ग जाता साताऱ्याला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Bugadi Majhi Sandli Ga lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the target
2| symbol at the top of the suitcase
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid