paroles de chanson / अपर्ण मयेकर parole / Lagali Kunachi Uchki lyrics  | ENin English

Paroles de Lagali Kunachi Uchki

Interprètes अपर्ण मयेकरप्रिया मयेकरचंद्रकला दसरी

Paroles de la chanson Lagali Kunachi Uchki par अपर्ण मयेकर lyrics officiel

Lagali Kunachi Uchki est une chanson en Marathi

आत्ताग
हे काय झालं
अग हो हो हो हो
अशी कुठ चाली पंजाब मेल झटके खात आ
आलि आलि सुगि म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची
ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

तरणीताठी नार शेलाटी
चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा
पदर वाऱ्यावर वर
फडामध्ये चाहुल वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची
ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

निजले डाव्या कुशी
हाताची उशी करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटा
थंडीचा काटा
मनात न्यारी खुषी
सपनात आला त्यानं
छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची
ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

उठून सकाळी लइ येरवाळी
गेले पानोठ्यावरी
उन्हात बसले न्हात अंगाला
पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं
त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली
फिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची
कुणाची गं कुणाची
ह्याची का त्याची
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Lagali Kunachi Uchki

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas du coeur
2| symbole à droite de la loupe
3| symbole en haut du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid