song lyrics / मराठी हिप हॉप / Samajik lyrics  | FRen Français

Samajik lyrics

Performers मराठी हिप हॉपAnkit Harchekar Marathiमॅडीरिदमॅटीक युगएमसी-विनाशकएमसी-आझादMaddy

Samajik song lyrics by मराठी हिप हॉप official

Samajik is a song in Marathi

मराठी हिप हॉप भाडीपा दोन हजार सतरा
हा मराठी मुलगा सायफर चा करतोय शुभारंभ
आवाज व शब्द बनून शंख करतील मंत्रमुग्ध
होणार दंग आम्ही अक्षरात ओततो अंतरंग
अणू अणूत मराठी रॅप जपतोय मी ऋणानुबंध
विचार भव्य सार्वभौम्य संग्रहित संघ
स्वतःच हित लिहीत या भेदक लिपीत
हे निश्चित असतं वेगळं काही पिढी पिढीत
या पीडित पिढीचं लिहतो नवं विधिलिखित
जिच्यामुळे मिळाला जन्म तिचं आयुष्य नकोसं
भ्रूणहत्या मुलीची पाहिजे मुलगाच वंश
वैचारिक अंधत्व दिसेना स्वतःतला दोष
शरीर केलं बलाढ्य पण मेंदू ठेवलाच षंढ
करणार व्यक्त सामान्य माणसाच्या हृदयातली खंत
जिच्याकडे होत आलंय वारंवार दुर्लक्ष
उत्तर मिळालं पाहिजे याचं, विदर्भाचा पाणी प्रश्न
मराठी माणसाची इतकी काळजी तर ठाकरे बंधू का नाही एकत्र
तुमच्या वतीने बोलतोय मी स्पष्ट मॉडर्न मावळा स्पष्टवक्ता राखतोय हे तख्त
चहावाला झाला पंतप्रधान अच्छे दिन स्वतः साठी फक्त
बीजेपी भरमसाठ जाहिरातींचा पक्ष
भाऊ आम्ही इतके कुशल महासागर
आमचा दर्जा भारतभर होतेय या मराठी मुलांची चर्चा
येतेय आमची हवा निलेश साबळे ला सांगा
बदलला मराठी रॅपचं गणित आता बदलणार व्याख्या
यायाय विनाशक सरळ गोरेगाव मधून ऐका
घडती गुन्हे गोठ्यात देश संकटात मोठ्या
कसायाशी मैत्री कपट मालकाच्या डोक्यात
संकटांना पाहून भोळी वासर पडली गोत्यात
जोडती हात देवास घाबरून जीव आहे धोक्यात
ढोंगी करती पाप लुटती गरीबास भोळ्या
नजर वाट खोटी ह्याना हानल पाहिजे जोड्यान
बलात्कार करती चारुन देव धर्माच्या गोळ्या
आसाराम म्हणे कोणी राम रहीम चोख्या
हरी ओम नाव ठेवून दाखवतोय नागडा नाच कोणी
बुद्धिहीन झालाय मानूस जोडतोय त्याला हात दोन्ही
अंधश्रद्धा भरली डोक्यातमधे सत्य गेल गारटूनी
शिक्षणाच्या आईचा घो! सांगा अशे का वागता तुम्ही
पाॅर्न स्टार जगते ऐटीत हीत रेप विकटीम का नाही
नजरेची करा नसबंदी असुरक्षित हीत बहीण आई
नकळत घडतोय अत्याचार होते जिवाची लाहीलाही
विनाशकाची बोली तीखट असत्य ह्यात काही नाही
या मराठी सायफर भाडीपा मराठी रॅप मराठी हिप हॉप ऐका
सांगतो खोटी ही स्वतंत्रता हरवली समता बंधुता
सत्यावर चालती बंदुका. बघूनपण अंधळा बनतो का
गेले कलबूर्गी दाभोळकर गौरी लंकेश नि पानसरे
अजून नाय भेटलेत गुन्हेगार कायद्याचे रक्षक झोपलेत का रे
विश्वस माझा न्यायव्यवस्थेवर पण न्यायाधीशांनवरती नाही
अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत त्यांची मुलबाळ नि नातेवाईक
करतोय आक्रोश क्रोध मनामध्ये भरलाय दाटून
कपटकारस्थान रचून नामर्द वार करतात पाठून
विचारवंत मेले जरी त्यांच्या विचारांना नसतो शेवट
कलयुगाचे शाहीर आम्ही रॅपर बंड पुकारतात हे ओठ
निर्भिड मी मांडू शकतो विचार लाभला साविंधानिक अधिकार
नागरीकत्व देशाच प्राप्त माझा पुरावा आधारकार्ड
धरतायेत जे आग्रह जून्या रूढीपरंपरा पून्हा राबवन्याचा
लोकशाही मिटवून हूकूमशाही पून्हा लादन्याचा
पण मी मागे नाय सरनार जरी क्रींतीत या सांडावे लागले रत्क
माझे प्रेरणास्थान महापुरुष आणि विवेकवादी विद्रोही संत
मी मॅडी बोलतो फक्त सामाजिक आता ऐक
नसतो कोणी जन्मजात गुन्हेगार इथे
समाज बिघडवतात समाजातले किडे
व्यभिचारी भ्रष्टाचारी भलते कर्मकांड
खिशात नाही दमडी फक्त चमडी वरती यांच ध्यान
बिघडला समाज यात दोष नक्की कोणाचा
तुझा माझा प्रत्येकाचा दोष पुर्ण देशाचा
नक्की आपल चुकतंय काय मेंदू आपला कुजलाय काय
याच खापर त्याचावर मग सत्तर वर्षे केलय काय
पेटुन सारे उठा सारे पापी धरुन ठेचा
नाही भारत लेचापेचा त्याला शिखरावरती खेचा
तोंडावरती फक्त राम खोटे सारे सत्यवान
विकली मायाममता सारी विकली यांनी सारी लाज
देशाला गरज आज खरयाखुरया क्रांतिची
गरज गरिबाला ताटामधे दोन भाकरीची
बंद करा रडगाणे आता तरी बना शहाणे
मिटवा गरिबीला गरिबाच्या पुर्ण विकासाने
तुझ मुल तुझी बायको तुझा परिवार.
तु स्वतामधे धुंद तुला दुसरा ना विचार
जरा घराबाहेर पड लोकांचे दुखं बघ
बघ डोळ्यांमध्ये तुझ्यासुदधा पाणी येतय का
राहिला प्रश्न मराठी माणसाचा
भावा बुलेट ट्रेन नाही पर्याय कोणत्या विकासाचा
पण तुम्हाला तर सवय कारण तुम्ही नाही एकजुट
क्रांतिकारी रक्त तरी केली तुम्ही घोडचूक
याय रिदमॅटीक करतो मंत्रमारा चल ऐक आता
शापित मी शब्दांचा रात्र अमावस्येची.
रचतोय ही रासलीला अपवित्र मंत्रांची
मांत्रिक मी सत्यवचन सत्यगाथा मांडतो मी
विक्रमाच्या पाठीवर वेताळ जसा नांदतो
दानपुण्य कमवण्यात समर्पित बुद्धी तुझी
वास्तुशांती होमहवन भूतबाधा आत्म्यांची
पिंपळाच्या झाडावरती बघत आहे वाट कोण
कर्मकांड हवसकुंड कोल्हेकुई झाली मौन
यज्ञकर्मी होण्याआधी यज्ञबळीला पडशील तू
जपशील रूद्राक्ष अग्निकुंडलात जळशील तू
गंडेदोरे हाती तुझ्या परमभक्तीचा पुजारी
योगसिद्धी मार्गक्रमणाची थट्टा मांडली
जटाधारी पंचकुटीत कुंडली मारून बसलेत
फसवलेत भाबडे भक्त यज्ञ पुन्हा भडकलेत .
हाती कवटी अंगी भस्म मुनीजनाचं रूप धारण
करून जुनाट मंत्र म्हणवतील तुला ते करून वश
जाप कर तू जपून महती शास्त्रांची जाण तू
पौराणिक ग्रंथ विद्या करून आत्मसात
संबळाचा सूर नरबळीच्या हिकमतीला करून वार
जादू टोणा शिकवणाऱ्या पुस्तकांची सोड साथ
भिक्षा मागुन जगणाऱ्या त्या भिक्षुकांचा भक्ष्य तू
दे लक्ष तुझ्या लक्ष्यावरती अश्वत्थामा बाळ तू
करविता तू अभिमन्यू गर्भाशयातच शिकलास तू
वक्रचक्रव्युह व्युहरचनेचा भेदक तू
क्रुतज्ञ तो क्रुतघ्नतेचा भग्न आरसा
कर्मठांस मुक्ती ना भटकल्या प्रेत आत्मा
स्वप्नांत पिशाच्च् गस्त घालतो निद्रेचा खात्मा तुझ्या
क्रुत्त्य अघोरी भंपक थोतांड घेईल बळी तुझा
नाही कळली तुला वाट योगसाधनेची
ना उमगली कोडी तुझ्या जन्म आणि म्रुत्यची
आधुनिक तंत्रज्ञान करत जा तू विकसित
दे तू संशोधनास नवी दिशा विज्ञानाची
हा मराठी रॅप सायफर दोन हजार सतरा
भाडीपा फक्त ऐका काय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Samajik lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the eye
2| symbol at the top of the heart
3| symbol to the right of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid