song lyrics / प्रभंजन मराठे / Majhya Mamachi Rangin Gadi lyrics  | FRen Français

Majhya Mamachi Rangin Gadi lyrics

Performer प्रभंजन मराठे

Majhya Mamachi Rangin Gadi song lyrics by प्रभंजन मराठे official

Majhya Mamachi Rangin Gadi is a song in Marathi

मामा च्या गावाला जाऊन आलात
कि मित्र मैत्रिणींना तुम्ही सगळ्या जमती जमती सांगता
मामाचा गाव कसंय घर कसंय
आणि हो मामा जवळ जर खिल्लाऱ्या बैलांची गाडी असेल
आणि तुम्ही त्यातून फिरला असला तर मग
किती सांगू आणि किती नको असं होत होय ना
हा छोटासा मुलगा गाण्यात त्याच कसं वर्णन करतो ऐका हा

माझ्या मामाची
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट
सारी सपाट वाट
नाही बिकट घाट
सारी सपाट वाट
मऊ गालीचे ठायीठायी हो
मऊ गालीचे ठायीठायी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो सर्जा
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
शीळ घालून मंजूळवाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
शीळ घालून मंजूळवाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबिल विहंग मेळा हो
गाई किलबिल विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात
करी सळसळ वात
बाजरीच्या शेतात
करी सळसळ वात
कशी घुमली अंबेराई हो
कशी घुमली अंबेराई हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती
नातू एकुलता
लेक एकुलती
नातू एकुलता
किती कौतुक कौतुक होई हो
किती कौतुक कौतुक होई हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो सर्जा
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Majhya Mamachi Rangin Gadi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the heart
2| symbol at the bottom of the smiley
3| symbol at the top of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid