song lyrics / शुभांगी जोशी / Jagatvandya Avdhoot Digambar lyrics  | FRen Français

Jagatvandya Avdhoot Digambar lyrics

Performer शुभांगी जोशी

Jagatvandya Avdhoot Digambar song lyrics by शुभांगी जोशी official

Jagatvandya Avdhoot Digambar is a song in Marathi

जगद्वंद्य अवधूत दिगंबरा दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
जगद्वंद्य अवधूत दिगंबरा दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे शरणांगत मी भवभय वारण तुम्हीच ना
कार्तवीर्य यदु परशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना
स्वामी जनार्दन एकनाथ तरि कृतार्थ केले तुम्हीच ना
नवनारायण सनाथ करुनी पंथ निर्मिला तुम्हीच ना
मच्छीन्द्रादि जती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना
दासोपंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना
नाथ सदनीचे चोपदार तरि श्रीगुरू दत्ता तुम्हीच ना
युगायुगी निजभक्त रक्षण अवतरता गुरु तुम्हीच ना
बलोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना
स्नान काशिपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना
करुनी भिक्षा करिविर भोजन पंचाळेश्वरि तुम्हीच ना
तुळजापुरी करशुद्धी तांबुल निद्रा महुरी तुम्हीच ना
करुनी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हीच ना
विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पीठापुरी गुरु तुम्हीच ना
श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती करंजनगरी तुम्हीच ना
जन्मताच ओंकार जपुनी मौन धरियेले तुम्हीच ना
मौजी बंधनी वेद वदुनीजननी सुखविली तुम्हीच ना
चतुर्थाश्रम जीर्णोद्धाराआश्रम घेउनी तुम्हीच ना
कृष्ण सरस्वति सद्गुरू वंदुनी तीर्था गमले तुम्हीच ना
माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना
पोटशुळाची व्यथा हरोनी विप्र सुखविला तुम्हीच ना
वेल उपटोनी विप्रा दिधला हेमकुम्भ गुरु तुम्हीच ना
तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्तवत्सल तुम्हीच ना
विप्रस्त्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना
हीन जिव्हा वेदपाठी केला सजीव करुनी तुम्हीच ना
वाडी नरसिंह औदुंबरही वास्तव्य करुनी तुम्हीच ना
भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना
ब्रम्हमुहूर्ती संगमस्थानी अनिष्ठानि रत तुम्हीच ना
भिक्षा ग्रामी करुनी राहतां माध्यान्ही मठी तुम्हीच ना
ब्रम्हराक्षसा मोक्ष देऊनी उद्धरीले मठी तुम्हीच ना
वांझ महिषी दुभविले फुलविले शुष्क काष्ठ गुरु तुम्हीच ना
नंदीनामा कुष्ठी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना
त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना
अगणीत दिधले धान्य कापुनी शूद्राशेत गुरु तुम्हीच ना
रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना
आठही ग्रामी भिक्षा केली दिपवाळी दिनी तुम्हीच ना
भास्कर हस्ते चारसहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना
निमिषमात्रे तंतुक नेला श्री शैल्यासी तुम्हीच ना
सायंदेवा काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना
चांडाला मुखी वेद वदविले गर्व हरया तुम्हीच ना
साठ वर्षे वांझेसी दिधलेकन्या पुत्रही तुम्हीच ना
कृतार्थ केला मानस पूजनी नर केसरी गुरु तुम्हीच ना
माहूरचा सातिपती उठवोनी धर्म कथियला तुम्हीच ना
रजकाचा यवनराज बनवुनी उद्धरिला गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे भजता सेवक तरतिल वदले तुम्हीच ना
कर्दळीवनिचा बहाणा करुनी गाणगापुरी स्थित तुम्हीच ना
निर्गुण पादुका दृष्य ठेऊनि गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना
विठाबाईचा दास मूढ परि अंगिकारिला तुम्हीच ना
आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दिनानाथ गुरु तुम्हीच ना
जगद्वंद्य अवधूत दिगंबरा दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
अनन्यभावे शरणांगत मी भवभय वारण तुम्हीच ना
भवभय वारण तुम्हीच ना
भवभय वारण तुम्हीच ना
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Jagatvandya Avdhoot Digambar lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol at the top of magnifying glass
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid